WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सिलेंडरचा स्फोट:बिर्याणी सेंटर जळून खाक

Image

वणी- येथील एकता नगरलगत एका बिर्याणी सेंटर भीषण आग लागली. ही घटना वरोरारोड एकतानगर च्या बाजूला असणाऱ्या बिर्याणी सेंटरला सिलेंडरचा स्फोट होऊन लागली. दरम्यान, पानठेला, झुणकाभाकर केंद्र आणि मूर्तिकाराचे शेड जळून खाक झाली आहे. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला नियंत्रणात आणने कठीण गेले असून नागरिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी बघ्याची गर्दी जमली असून अवघ्या 30 मिनिटात अग्निशमन दलाने आग विझवली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले