WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सरकारच्या 13 कोटी वृक्ष योजनेचा सावळा गोंधळ वणी पंचायत समिती अंतर्गत मानकी ग्रा,पं,चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

ImageImageImageImage

वृक्ष लागवड न करताच वृक्ष नाल्यात फेकून दिले....

प्रतिनिधी सागर मुने, वणी

यवतमाळ जिल्ह्यातील वणी पंचायत समिती मध्ये येणाऱ्या माणकी या गावात सरकारच्या 13 कोटी वृक्ष योजनेचा फज्जा कसा उडाला .....

'झाडे लावा झाडे जगवा' हा शासनाचा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम महाराष्टात मोठया प्रमाणात राबविला जात आहे.

या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यला लाखो वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असून प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतीना वृक्ष लागवड करायचे असून याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध झाला आहे. काही ग्रामपंचायतींनी वृक्षांची लागवडही केली आहे, तर काही ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवड न करताच थातुरमातुर वृक्ष लागवड केल्याचे दाखवून निधी हडप केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत,

अशीच एक घटना वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजा मानकी ग्रामपंचायत मध्ये घडली आहे.

मानकी ग्राम पंचायत मार्फत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात मध्ये ठेवण्यात आलेले शेकडो वृक्ष १९ ऑक्टोबर ला शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान महिला सरपंच अरुणा काकडे यांच्या बैल बंडीत भरून गावाला लागूनच असलेल्या नाल्यात फेकून दिले आहे असे प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या नागरिकांनी सांगितले आहे, या प्रकाराची गावातील काही नागरिकांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर नाल्यात वृक्ष फेकल्याचे आढळून आले. याप्रकरणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे तक्रार दाखल करणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. इतकेच नाही तर या आधीही या मानकी ग्रामपंचायत मध्ये वृक्ष लागवड न करताच सामान्य फंडातून पैशाची अफरातफर केल्याचे एका तक्रारीवरून चौकशी मध्ये उघड झाले आहे. याबाबतचा अहवाल पं,स,वणी यांनी सादर केला असून कारवाई सुरू असतांनाच शनिवारी दि,१९ ऑक्टोबरला हा प्रकार घडला आहे.

सरकारचे धोरण उत्तम आहे पण अधिकारी व लोक प्रतिनिधी यांनी वृक्ष लागवड ची भोंगळ कारभार स्वतः च केला अस म्हणायला हरकत नाही. आता या प्रकरणावर वणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेस गायणार, सभापती लीशा विधाते व उपसभापती संजय पिंपळशेंडे हे कारवाई करते की प्रकरण दडपणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......