WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

झेंडूची फुलं घेताना सावधान.....विक्रेते करतात ग्राहकांची फसवणूक.........

Image

सागर मुने, वणी

30 रुपये किलो विक्रीने होते फसवणूक...

दिवाळीचा सण असल्याने बाजारात ग्राहकांची गर्दी आहे. शहरात झेंडूची फुले घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. 30 रुपये किलो ने विक्री सुरू आहे. मात्र किलो मागे 300 ते 400 ग्रॅम कमी वजनाने देतात. त्यामुळे शहरात सर्रास ग्राहकांची फसवणूक करून त्यांना लुटणे सुरू आहे.

टिळक चौकात अनेक दुकाने लागली आहे. ग्राहक त्यांच्या कडून झेंडूचे फुले 2, 3 किलो घेताना दिसत आहे. मात्र घरी गेल्यावर त्यांनी दुसऱ्या वजन काट्यावर मोजले तर लक्षत आले की टिळक चौकातील झेंडूचे फुले विकणारे हे ग्राहकांची चांगलीच फसवणूक करत आहे. या विक्रेत्यांवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत वैध मापन शास्त्र अधिकारी , निरीक्षक वैध मापन शास्त्र वणी चे अधिकारी त्यांचे वजन काटे तपासणी करून त्यांच्यावर कार्यवाही करतील की ग्राहकांची फसवणूक होऊ देईल. संबंधित विभागाणे कार्यवाही करावी अशी मागणी नागरिक करत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले