WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गुलाबराव खूसपूरे यांचा अमृत महोत्सव संपन्न

Image

सुरज चाटे वणी:-

वणी येथील जेष्ठ समाजसेवक व अन्नछत्र सेवा समितीचे अध्यक्ष गुलाबराव खुसपूरे यांचा अमृत महोत्सव समारोह जैताई मंदिर वणी येथे दिनांक 31 आक्टोबरला विविध संस्थाचे वतीने मोठ्या ऊत्साहात संपन्न झाला.

जैताई देवस्थान समिती, खूसपूरे मित्र मंडळ वणी व खूसपुरे कुटुंबीय यांचे वतीने आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनुमहाराज तुगनायक हे होते तर सत्कार कर्ते व प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद पुंड हे होते.

यावेळी वणी येथील विविध सामाजिक व धार्मीक संस्था व अनेक मान्यवरांनी वैयक्तिक पणे सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने जैताई देवस्थान वणी,अन्नछत्र सेवा समिती, जैताई योग वर्गातर्फे योग शिक्षक व योगसाधक, विदर्भ साहित्य संघ, नगर वाचनालय, रंगनाथ स्वामी मंदिर, मित्र मंडळ, जेष्ठ नागरिक मंडळ, नगर सेवा समिती, योग वेदांत समिती, गुरूदेव सेवा मंडळ, धनोजे कुणबी समाज संस्था ईत्यादी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक आकुलवार, लक्ष्मण ईद्दे, दिलीप कोरपेनवार, रमेश बोबडे, विजयाताई दहेकार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

संचलन कार्यक्रमाचे आयोजन माधवराव सरपटवार व गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन राजेश खुसपूरे यांनी मानले. रेणुका अणे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले