WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अपंगाकरीता मोफत जयपुरी फुट वाटप आणि तपासणी शिबीर

Image

वणी: नगर परिषद वणी, एसीसी ट्रस्ट ,एमझेड आणि शाह फौऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कल्याण मंडप, डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौक वणी येथे दिव्यांग बांधवांसाठी शुक्रवार दि.०८-११-२०१९ सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० च्या दरम्यान मोफत जयपुरी फुट वाटप करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर दिव्यांग बांधवांची तद्न्य डॉकटर कडून तपासणी करण्यात येणार आहे आणि तपासणी नंतर त्यांना कृतीम हात, कुबड्या इत्यादी वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. शिबिराला जास्तीत जास्त आस्थी व्यंग बांधवांनी उपस्थित राहून सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर परिषदेचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, मुख्याधिकारी संदीप बोरकर, शिबीर संचालिका अॅड.पौर्णिमा शिरभाते, उत्तम हापसे, रवी अत्राम, विनोद मनवर आणि एसीसी ट्रस्ट चे नागेश्वर गोरे यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले