WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत जागतिक रंगभूमी दिन साजरा

Image

जेष्ठ कलावंत अशोक सोनटक्के यांचा रंगभूमी दिना निमित्त सत्कार

येथील सागर झेप नाट्य संस्थेद्वारा जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी येथील जेष्ठ कलावंत अशोक सोनटक्के यांचा सत्कार करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. स्वा.सावरकर नगर परिषद शाळा क्र.5 मध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कासावार होते. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ रंगकर्मी अशोक सोनटक्के होते. शहराला सांस्कृतिक वारसा लाभला असून नाट्य कलावंत आपल्या रसिकांना समाजातील होणाऱ्या घटना अभिनयातून दाखवतो. आपल्या अभिनय कलेने रसिकांची मने जिंकणारे, वणी शहरात मागील पाच दशकापासून निःस्वार्थ पणे रंगदेवतेची सेवा करणारे नाट्यकर्मी टिळक महाविद्यालयाचे सहसचिव, जेष्ठ नाट्य कलावंत अशोक सोनटक्के यांचा जागतिक रंगभूमी दिना निमित्ताने सत्कार होणे ही सुद्धा एक प्रकारे रंगदेवतेचा सन्मान आहे. अशी प्रतिक्रिया गजानन कासावार यांनी व्यक्त केली. या प्रसंगी आयोजक संस्थेचे अध्यक्ष सागर मुने यांनी वणी येथील नाट्य चळवळ पुन्हा पुनरुज्जीवित केल्याबद्दल त्यांचा सुध्दा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सुनंदा गुहे, अमोल खडसे, शुभम उगले, आकाश महादुले यांनी रंगभूमी दिना निमित्त मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश गोहोकार याने केले. शंतनू मुने, लीना गुप्ता, निकुंज सातपुते, निकिता बोबडे, प्रणय मुने, अविनाश शिवणीतवार, सुभाष गुहे या नाट्य रसिकानीं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.