WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मॅकरून शाळेत फिटनेस सप्ताह ......

Image

मॅकरन स्टुडंट्स अकॅडमी सी बी एस ई शाळा वडगाव रोड वणी येथे शारीरिक तंदुरुस्ती सप्ताह चे आयोजना दि ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात येत आहे .

काम्पुटर आणि मोबाईल च्या आधुनिक युगात विध्यार्थी अभ्यासक्रमा मध्ये गुरफटलेले असतांना त्यांच्या जीवनात व्यायामाचे महत्व वाढवण्यासाठी तसेच विध्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करण्यास हा सुदृढ सप्ताह घेण्यात येत आहे.

यामध्ये योगासन , एरोबिक , जिमन्यास्टिक , संगीतमय कवायत , विविध मैदानी खेळ , पोस्टर मेकिंग स्पर्धा , पोषक आहार आणि त्याचे महत्व , नियमित व्यायाम आणि त्याचे महत्त्व , या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आणि वाद - सवांद घेण्यात येत आहे . आज दि.११नोव्हेंबर ला कार्यक्रमाचा पहिला दिवस शाळेतील सर्व विध्यार्थी , शिक्षक वृंद तसेच इतर कर्मचारी यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमात सहभाग घेतला .

कार्यक्रमाचे आयोजन शारिरिक शिक्षक सुधीर लडके व सहाय्यक निखिल घाटे यांनी केले . कार्यक्रमाचे संचालन वर्ग १० ची विध्यार्थीनि कुंमकूम झाडे हिने केले . तरकेश्वरी ठोंबरे हिने सकस आहार आणि सुदृढ शरीर या विषयावर भाषण केले. कौशल पावडे याने योगासन या विषयाचे महत्व सांगितले. सुधीर सर यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्थारिय योगपटू वर्ग ८ क्रिष्णा लडके याने सूर्यनमस्कार आणि त्याचे १२ प्रकार तसेच सहज करता येणारे योगासनाचे प्रात्यक्षिक केले. मुख्यध्यापिका शोभना मॅडम , शिक्षक वृंद , विध्यार्थी यांनी प्रात्यक्षिकाच्या कृतीत सहभाग घेऊन योगासनाचा आनंद लुटला .सुधीर सर यांनी विध्यार्थ्यांना योगासनाचे महत्व पटवून दिले. मुख्याध्यापिका शोभना मॅडम यांनी रोज नियमित व्यायाम आणि योगासन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांकडून घेतला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.