WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

21 व्या शतकातील कौशल्य प्राप्तीसाठी शिक्षकांनी अद्ययावत व्हावे गजानन बोढे

Image

वणी:- आपल्या राज्याला विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवायचे आहे. 21 व्या शतकातील आव्हानांना स्वीकारल्याचे असल्यास आपला विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकावा असे जर शिक्षकांना वाटत असेल तर 21 व्या शतकातील कौशल्य प्राप्त करण्यासाठी शिक्षकांना नवनवीन प्रयोग करत अद्ययावत व्हावे लागेल असे प्रतिपादन राज्य स्तरावरील तज्ज्ञ इंग्लिश विषयाचे सुलभक प्रयोगशील यशस्वी शिक्षक गजानन बोढे यांनी केले. ते येथील गट संसाधन केंद्रातर्फे वर्ग 1 ते 5 च्या शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इंग्लिश विषयाचे कार्यशाळेत बोलत होते. येथील वणी पब्लिक स्कूल मध्ये आयोजित या कार्यशाळेच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य थॉमस हे होते. प्रमुख अतिथी म्हणून या कार्यशाळेचे आयोजक गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, प्रेस वेलफेअरचे अध्यक्ष गजानन कासावार, केंद्र प्रमुख लक्ष्मण इड्डे, प्रकाश नागपुरे, नवनाथ देवतळे, राजेंद्र कोरडे उपस्थित होते.

या प्रसंगी कार्यशाळेत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करतांना गजानन बोढे म्हणाले की, विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने शिक्षकांना समृद्ध करतात, शिक्षकांना घडवतात. शिक्षकांना अद्ययावत करण्यासाठी बाह्य प्रेरणा व स्व:प्रेरणा कारणीभूत ठरतात. यातून प्रेरित होऊन केलेले काम विद्यार्थ्यांच्या जीवनाची दिशा बदलवू शकतात.

अध्ययन अध्यापना साठी शैक्षणिक साहित्यची महत्वाची भूमिका असते असे सांगून इंग्लिश विषय शिकवण्याची सुरुवात 26 अक्षरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधिक कार्डद्वारा करावी. इंग्लिश मधील अक्षर गटांचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून 75 कामाच्या दिवसात प्रत्येक मुलगा चांगल्या पद्धतीने कसा वाचू शकेल हे त्याच्या अनुभवातून चालचित्राद्वारे उपस्थितांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना इंग्लिश अक्षरांच्या नावाची ओळख करून देण्याऐवजी त्यांना अक्षरांच्या आवाजाची ओळख करून दिल्याने त्यांना वाचन करणे सोपे जाते हा मूलमंत्र त्यांनी दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद नासरे यांनी केले. आभार प्रदर्शन मंगेश खामनकर यांनी केले. विकास चिडे यांनी तंत्रज्ञानाची बाजू सांभाळली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......