WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति दिना निमित्त शवविच्छेदन करणारे मारोती किनाके यांचा सन्मान करून अभिवादन केले.

Image

जिल्हा यवतमाळ

तालुका वणी

प्रतिनिधी सागर मुने

शिवसेनाप्रमुख स्व .बाळासाहेब ठाकरे यांचा 7 वा स्मृतिदिन वणी येथे शहर अध्यक्ष राजू तुरांकर यांनी सकाळी 6 वाजता स्मारकाची जलाभिषेक करून हारार्पण केले. त्यानंतर गोरगरिबांना सोबत घेऊन कार्य करा त्यांना मदत करा, सन्मान करा असे विचार असणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले राजू तुरांकर यांनी वणी ग्रामीण रुग्णालयात वार्ड बॉय, जखमी रुग्णांवर ड्रेसिंग करणे व शवविच्छेदन असे सर्व काम फक्त 100 रुपये प्रतिदिन या मानधनावर काम करतात आणि उदरनिर्वाह कसा चालत असेल हा प्रश्न उपस्थित होतो. समाजसेवक असणाऱ्या मारोती की किनाके यांचा सन्मान करून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

शिवसैनिक राजू तुरांकर व नगर सेवा ससमिती दर रविवारी या परिसरात स्वच्छता मोहीम राबवितात व बाळासाहेब यांच्या स्मारकाला व परिसराला स्वच्छ करतात. सामान्य माणसाचा सन्माम करणे व त्यांना न्याय देण्याचा कार्य सेना करते म्हणून अल्प मानधनात सेवा देणाऱ्या मारोती किनाकेचा सन्मान करून त्यांच्या विचारला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकस, वणी विधानसभा संघटक सुनील कातकडे, युवासेना तालुका सचिव अजिंक्य शेंडे, विभाग प्रमुख मंगल भोंगळे, सतीश लडके, शुभम गोरे, माजी नगर सेविका पुष्पा कुलसंगे, सुधीर थेरे, जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, रवी देठे, प्रमोद मिलमिले, सुभाष ताजने, सचिन ठावरी व शिवसैनिक उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.