WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ज्यांचे कोणी नाही त्यांचे मिञ आहे- प्रफुल भोयर

Image

वणी- लगतच्या मुकूटबन येथील प्रफुल भोयर या युवकाने केला अनाथांसोबत वाढदिवस साजरा. धावपडीच्या या युगात पैशांची उधळन हि केक तथा पार्टी पेय करून वाढदिवस साजरा करीत युवक आढळुन येतात. परंतु याच युगात प्रफुलने अगदी साध्यापद्धतीने वणी येथील बालसदन मध्ये स्वताच्या मिञमंडळीला घेऊन साजरा केला. बालसदन हे अनाथांचे घर असते. परंतु ज्यांना कोणी नाही त्यांचे मिञ आहे हि सद्भावना जागत त्या बालसदन मधील मिञमैञीनी सोबत एक अनोखा वाढदिवस प्रफुल ने साजरा करून त्या अनाथांच्या चेहऱ्यावर आपुलकिची भावना रेखाटीत आनंद दिला. अल्पोउपहार व काही फळवाटप करून त्या मुला मुलीसोबत प्रफुल व त्याचे सहकारी मंडळी सह सर्वजन मिळुन एकञीतपणे या वाढदिवसाचा आनंद लुटीत अल्पोउपहार चा आस्वाद घेतला. प्रफुल हा रक्तदान क्षेञात सदैव अग्रेसर असतो. तसेच त्याला रक्तदान क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नुकताच राज्यस्थान मधील हनुमानगढ़ येथे राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. हिच असी सामाजीक बांधिलकी जोपासुन प्रफुल ने रक्तदान क्षेञातुन कित्येक कुटूंबाच्या चेहऱ्यावर आनंद दिला. व आज स्वताच्या वाढदिवसाला पार्टी चे आयोजन न करता एक वेगळी भुमिका राबवित त्या अनाथ मंडळीसोबत वाढदिवसाचा अमूल्य क्षण साजरा केला. यावेळी अनाथ आश्रम चे संतोष किंगरे सर, प्रफुल सोबत आलेले आकाशदादा सुर, राहुल खारकर, प्रफुल पांगुळ, फैज शेख, विठ्ठल मांडवकर, अश्विन रूयारकर तथा इतरञ सहकारी मिञबांधव व तेथील विद्यार्थी उपस्थीत होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले