WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथे 'विजय ते विराजमान' जल्लोष साजरा....

Image

-प्रतिनिधी अमोल कुमरे

वणी- ‘भारतीय जनता पार्टी’ वणी तालुका संघटनेच्या वतीने मा. श्री देवेंद्रजी फडणवीस हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याबद्दल वणी येथील शिवाजी चौकामध्ये श्री विद्यमान आ. संजीव रेड्डी बोद्कुरवार साहेब यांच्या उपस्थितीत 'विजय ते विराजमान' उत्सव साजरा करण्यात आला. फडणविस साहेब यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि भाजप कार्यकर्त्यात अनंदाची लाट उसळली. पुष्पवर्षा सुमनाने हा आनंद हर्ष जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यमान बोद्कुरवार साहेब यांचा पुष्पगुच्छ व हार घालून जोरदार स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आमदार साहेबांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री तरेंद्र्जी बोर्डे, रवि बेलुरकर, दिनकर पावडे, मनीष गायकवाड, विजय पिदुरकर व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले