WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भीषण आगीत कापड दुकान जळून खाक

Image

शॉटसर्किटमुळे दुकानामालकाचे लाखोंचे नुकसान,

-प्रतिनिधी/सचीन मेश्राम

मारेगाव- शहरातील मार्डी रोडलगत येथील भर वस्तीत असलेल्या कापड व हार्डवेअर दुकानाला आग लागली. या आगीत कापड दुकान जळून खाक झाले. त्यात लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान, आगीमुळे शेजारील एका दुकानालाही आग लागली. मात्र, एक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात युवकांना व अग्निशमन दलाला यश आले.

या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ८:30 वाजताच्या सुमारास घडली.

मारेगाव तालुक्यातील रविंद्र काळे यांचे पाच वर्षांपासून कापड दुकानाचा व्यवसाय आहे. या दुकानात कपडे, फर्निचर व इतर सामान गच्च भरून होते. ते अचानक शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण जळून खाक झाले. आगीचे कारण कळू शकले नसले, तरी लाईनच्या शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आग लागताच, आगीने उग्र रूपधारण केले. आगीचे धुर आकाशात लोळ पसरू लागले. दुकानाच्या शेजारी असलेल्या घरांनाही आगीची किरकोळ झड सोसावी लागली. आगीची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी वणी नगर परिषद व नगर परिषद अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तब्बल दोन तास परिश्रम घ्यावे लागले त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

सामाजिक बांधिलकी दाखवीत पप्पू देठे, गणेश चौधरी, इमरान शेख यांनी आग विझविण्यासाठी यांनी पोलीस कर्मचारीसह आग विझविण्यात सहकार्य केले. यावेळी बघ्याची गर्दी असल्याने जनतेला नियंत्रीत करण्यासही या तरुणांनी मदत केली.

काळे यांच्या कापड दुकानाला अचानक आग लागली ही बातमी माध्यमातून वाऱ्या सारखी पसरली असून घटनास्थळावर आग विझविण्यासाठी युवकांनी धाव घेऊन सर्वोतोपरी प्रयत्न केले आणि आगीवर एक तासानंतर नियंत्रण मिळविले. यात कापड दुकानाचे लाखोचे नुकसान झाले. पण मात्र, सुदैवाने कुठलीही जिवित हानी झाली नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......