WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माजी मुख्यमंत्री मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार पुण्यतिथी साजरी

Image

प्रतिनिधी, रोहन आदेवार

वणी - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, बहुजन नायक, विदर्भ पुत्र स्व.मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांची पुण्यतिथी 24 नोव्हेंबर 2019 (रविवार) रोजी सकाळी 08.30 वाजता कन्नमवार चौक, वणी येथे साजरी करण्यात आली.

आदरांजली कार्यक्रमाचे संचालन सागर बरशेट्टीवार यांनी केले. अशोक आकुलवार आणि दिलीप कोरपेनवार सर यांनी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या विषयी माहिती देऊन मनोगत व्यक्त केले. यावेळी क. दादासाहेब कन्नमवार यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. तसेच 2 मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली देण्यात आली.

या आदरांजली कार्यक्रमास नगर परिषद वणी बांधकाम सभापती राकेश बूग्गेवार उपस्थित होते. तसेच बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी, युवा बेलदार शहर कार्यकारिणी, वणी, बेलदार समाज महिला कार्यकारिणी वणीचे सर्व पदाधिकारी तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.