WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बहुजन स्टुडंट्स फेडरेशन वणी च्या वतीने संविधान दिन व संविधान अभिवादन दौड संपन्न

Image

वणी:- 26 नोव्हेंबर ला 1949 ला भारतीय न्यायव्यवस्था व भारताची लोकशाही नियमितपणे सुरळीतपणे मार्गक्रमण करून येथील सर्व समाजातील सर्व घटक आपल्या संख्ये प्रमाणे त्यांना समान न्याय समान अधिकार त्याची मूल्य व एकंदर मानवमुक्तीच्या सर्वांगीण विकास कसा करता येईल असा संविधान प्रत डाँ बाबासाहेबानी संविधान तत्कालीन राष्ट्रपती समक्ष राष्ट्राला अर्पित केलं तो दिवस म्हणजे आज संविधान दिन म्हणून ओळखला जातो त्या अनुषंगाने त्या दिवसाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सर्व प्रशासकीय कार्यलयात साजरा करायाच आदेश देण्यात आले त्यामुळे बहुजन स्टुडंटस फेडरेशन च्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला

ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संतोष कुचनकार,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, युवराज जंगले,कृषी अधिकारी प. स. वणी , दिपक मालेकर सर,API आयरे साहेब वाहतूक विभाग , विजय वानखडे, ऍड राहुल खापर्डे, रवींद्र कांबळे,डॉ. कांबळे साहेब, गजानन चंदावर, प्रवीण खानझोडे, किसन कोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्पन्न झाला ह्या अभिवादन संविधान दौड शहरातील डॉ.आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी चौक ते राजमाता जिजामाता चौक ते शिवाजी चौक ते डॉ.आंबेडकर चौक इथे समापण झाले,लगेच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. दौड मध्ये एकूण दोनशे चे वर स्पर्धेकानी सहभाग नोंदविला ह्या स्पर्धेत एकूण त्यामध्ये प्रामुख्याने महिला नि सुद्धा सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाचे संचालन महेश लिपटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राकेश वाघमारे यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमासाठी यशस्वितेसाठी बहुजन स्टुडंट्स फेडरेशन,वणी ,संत रविदास महाराज युवा मंच,वणी ब्लू व्हिजन,राजूर कॉ, बेलदार समाज बहूउध्येशिय संस्था,वणी यांचे विकी जंगले, सागर बरशेट्टीवर, लिकेश चंदे, शंकर निब्रड, सौरभ वानखेडे, पंकज कांबळे, अंकुश पेटकर, तुषार साव सर्वं कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR