WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत महाविकास आघाडीचा 'जल्लोष', शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र

Image

फटाके, नृत्य आणि मिठाई असा मिश्र आनंदत्सव व जल्लोष महाविकास आघाडीत...

-अमोल कुमरे

वणी- 'नवी दिशा, नवे पर्व' हे आज या महाराष्ट्राला अनुभवायला मिळाले, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारतीय इतिहासात सुवाच्य अक्षरांत लिहून काढावा असा हा आजचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

मा. उद्धवजी ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अख्खा महाराष्ट्र शिवगर्जनेसह जल्लोषात न्हाऊन गेला. याचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रासह यवतमाळ जिल्ह्यातील वणी या तालुक्यात त्याचं क्षणी पाहायला मिळाली. वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समस्त महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. 'न भूतो न भविष्याती' असा हा अविस्मरणीय क्षण येथील जनतेनी अनुभवला आहे. या जल्लोषात सामील होण्याचे आवाहन शिवसैनिक संजय भाऊ निखाडे व राजूभाऊ तुराणकर यांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना केले होते. ते आज फळीस आले.

20 वर्षानंतर शिवसेनेला बहुमान मिळाला, मुख्यमंत्री मिळाला. हा तमाम शिवसैनिकांचा सन्मान आहे. सत्तास्थापने विषयी बऱ्याच तर्क वितर्कांना उधाण आलं होतं. त्या सर्व अविवेकी तर्कांना शांत केलं तो महानायक योध्या मा. शरदचंद्रजी पावर साहेब. वयवर्ष 80 हे वादळ कधी येईल आणि काय करून जाईल याचा नेम नाही. गेल्या महिन्याभरात जे राजकीय नाट्य चाललं होत तेही जनतेनेनी अनुभवलं. शेवटी 'शरद पवार' वादळ आलं आणि या राजकीय नाट्य'ची सांगता करून महाराष्ट्राला, इथल्या तमाम 'धर्मनिरपेक्ष' जनतेस जे अपेक्षित होतं तेच करून दाखवलं हा अभिमान या सोहळ्यादरम्यान, समस्त महाराष्ट्राने, महाविकास आघाडीने मिळवला असं म्हणायला हरकत नाही.

या शपथविधी सोहळ्यात राज्यासह इतरही राज्यातील मंत्री महोदयांनाही सोहळ्यात आमंत्रित केले होते. सिनेजगतापासून तर व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. सुवर्ण अक्षरात कोरावा असा हा ऐतिहासिक सोहळा गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी संपन्न झाला. या सोहळ्यात मा. छगन भुजबळ (राष्ट्रवादी), मा. नितीन राऊत (काँग्रेस), मा. एकनाथ शिंदे (शिवसेना), मा. जयंत पाटील (राष्ट्रवादी), मा. बाळासाहेब थोरात (काँग्रेस) मा. सुभाष देसाई (शिवसेना) यांनी ही शपथ घेतली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.