WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मुलीच्या कुटंबीयांनी मुलाला केली बेदम मारहाण

ImageImage

सामाजिक प्रतिष्ठा जपत मारहाणीची तक्रार मात्र पोलिसात दिली नाही

-प्रतिनिधी/ सचिन मेश्राम

मारेगांव- एका प्रेमवेड्याला मुलीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी मारेगांव येते घडली असून या मारहाणीची चर्चा सध्या शहरात होत आहे.

अमानुषपणे मारहाण करण्यात आलेल्या या घटनेची पोलिसात तक्रार नसल्याने कारवाई झाली नसल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे. मारेगांव येथील एका महाविद्यालयात वणी भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी अप-डाऊन करतात. यातील एक विद्यार्थिनी आज दुपारी आपल्या मित्रासोबत येथीलच राष्ट्रीय महाविद्यालय येथे गप्पा मारत होती. याची माहिती तिच्या कुटुंबातील मंडळींना मिळाली. मंडळींनी मारेगांव राष्ट्रीय महाविद्यालय गाठून दोघांना रंगेहात पकडले आणि तेथेच त्यांना बेदम मारहाण केली.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीकडील मंडळी तिला घेऊन निघून गेले. या घटनेचे बघ्यांची भुमिका मात्र नागरिकांनी घेतली असून शूटिंग करण्यात बिझी झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला अशी चर्चा आहे. परंतु या याप्रकरणी मारेगांव पोलिस ठाण्यात अद्याप कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. सदर घटना सामाजिक प्रतिष्ठा जपून कारवाही केली नसल्याची चर्चा मारेगांव शहरात  सर्वत्र होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले