WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सौ.प्रीती दरेकर यांना सिंधुताई सपकाळ यांनी गौरविले ...

Image

वणी :-

महिला सशक्तीकरण व लेकवाचवा, लेकशिकवा असे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक योगदान करणाऱ्या सौ, प्रीतीताई विनोद दरेकर यांना दिनांक २७ नोव्हेंबर२०१९ ला सेवाव्रत बहुउद्देशीय संस्था नागपूर याच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणार ' राज्यस्तरीय माझीमाई ' पुरस्कार महाराष्ट्रातील अनाथ व गोरगरीबांची माई डॉ. सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले

बेटी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. प्रीतीताई विनोद दरेकर यांनी बेटी फाउंडेशन स्थापन करून अनाथ गोरगरिब मुलिंची गरज समजून घेऊन व सोडवून मायेचा आधार देण्याचे कार्य करीत सामाजिक व साहित्य क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवित लेख, व कविता लिहून आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित केली आहे तसेच दरवर्षी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करुन नवोदितांना व्यासपिठ मिळवुन देण्याचे कार्य प्रितीताई मागिल चार वर्षांपासुन सातत्याने करित आहेत,अशा प्रकारच्या सामाजिक व साहित्यिक योगदानाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला

यावेळी प्रिती दरेकर ह्यांची साहित्य सेवा आणि समाजसेवा ही येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरित करणारी आहे असे भावनिक वक्तव्य डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले , कार्यक्रमाच्या उद्घाटक डॉ,सिंधुताई सपकाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सविता मोहन मत्ते होत्या ,तर मुख्य उपस्थिती म्हणुन ग्रामगितचार्य अनिलजी पिट्टलवार उपस्थित होते सदर कार्यक्रमाला संपुर्ण राज्यातील तळागाळातील साहित्यिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ,,,

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.