WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नितळ मनाच्या डोहात लाभते आत्म संवादाचे सुख - प्रा. मृणालिनी वाघमारे.

Image

आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात सुद्धा आजूबाजूला शांतपणे पाहिले तर कितीतरी हलक्याफुलक्या गोष्टीत चिंतन करावे, अंतर्मुख व्हावे असे विचारकण सापडतात. ज्यांना साठवलेल्या मनाच्या डोहात शांतपणे पाहिले तर आत्म संवादाचे आगळे सुख लाभू शकते असे विचार नागपूर येथील सुविख्यात चिंतन प्रवर्तिका प्रा. मृणालिनी वाघमारे यांनी व्यक्त केले.

सुधीर तथा मंजिरी दामले यांनी विदर्भ साहित्य संघाच्या वणी शाखेला दिलेल्या देणगीतून आयोजित स्व. वामन विष्णु वैद्य परतवाडा स्मृति व्याख्यानात ' मन डोह- एक आत्म संवाद' या विषयावर त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड, नगर वाचनालयाचे अध्यक्ष तथा विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माधव सरपटवार आणि नगर वाचनालयाचे सचिव, विदर्भ साहित्य संघ वणीचे उपाध्यक्ष गजानन कासावार उपस्थित होते.

आजूबाजूला होत असलेल्या पिढी दर पिढी बदलातून परिवर्तनाच्या या काळात चिंतनशील झालेल्या माझ्या मनात या सर्व परिस्थितीवर आपण काय करू शकतो? असा विचार आल्यावर गेल्या अधिक महिन्यात या तीस कथांचे लेखन केले असे सांगत त्यांनी त्यातील काही निवडक कथांच्या आधारे , जीवनात सहज फुलणारा विनोद, सामान्य माणसाची सकारात्मकता, भारतीय वेशभूषेत समान गोष्टीची उपयुक्तता, भारतीय मूल्यांचे त्रिकालाबाधित्व इ. विविध बाबी स्पष्ट करून सांगितल्या.

कार्यक्रमाच्या आरंभी संविधान दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा संविधान सभेचे सदस्य असणारे वणीचे भूषणीभूत सुपुत्र पद्मविभूषण बापूजी अणे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात या व्याख्यानमालेची पार्श्वभूमी आणि वक्त्यांचा परिचय माधव सरपटवार यांनी करून दिला.

अध्यक्षीय मनोगतात जीवन पुष्पाच्या पाकळ्यांना शांतपणे सोडून देऊन आतला शाश्‍वत मध स्वीकारण्याच्या मनोवृत्तीतून निर्माण झालेल्या या कथा खरोखरच प्रशंसनीय आहेत असे विचार विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कासावार यांनी केले. वणीकर जनतेने दिलेला भरगच्च प्रतिसाद कार्यक्रमाचे वैभव होय.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.