WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कातरवेळ पाहुन चंद्रपूर रसिक झाले भाऊक....

ImageImage

अमोल कुमरे

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत ज्योति बहुद्देशीय संस्था वणी च्या वतीने डॉ माणिक वड्याळकर लिखित दोन अंकी नाटक ' कातरवेळ ' याचे सादरीकरण झाले. विस्कळीत झालेले कौटुंबिक नाटकात हेमंत चौधरी यांची मधुकर ची वडिलांची भूमिका दोन्ही मुलांना सांभाळने कठीण होते व त्यात त्यांना प्रत्येक वेळी लहान मुलगा विशाल म्हणजे सागर मुने त्यांच्या चुकी मुळे आई चा मृत्यू झाला याला दोषी समजतो. त्यामुळे मधूकरची खूप वाताहत होत असल्याने हतबल झालेले आहे. प्रवीण सातपुते यांनी दादा कुंटे ही मित्राची भूमिका अत्यंत प्रांजल पणे साकारली सतत होणारे वाद , त्यामुळे मधुकर व विशाल याना समजवण्याचा प्रयत्न करतात. योगिता बोबडे ही मधूकरची विवाहित मुलगी असून बाबा हे आईच्या मृत्यूला व धीरज च्या व्यसनाला जवाबदार नाही असे विशाल ला समजावून सांगत असते आणि घर विस्कळीत होऊ नये यासाठी ती घर सांभाळते. व्यसनाधीन असलेला धीरज च्या भूमिका मंगेश गोहोकार याने भ्रमित असलेला, वेडसर अभिनय उत्तम केला. अमोल खडसे याची केदारची भूमिका कुटुंब एकत्र करण्याची होती.

कातरवेळ नाटकाचे दिग्दर्शक प्रा. हेमंत चौधरी यांनी केले, गणेश मते यांनी प्रसंगाला अनुसरून पार्श्वसंगीत दिल्याने चंद्रपूर रसिक अश्रू रोखू शकले नाही. नेपथ्य शुभम उगले, प्रकाश योजना अतुल डफ, रंगमंच व्यवस्था संजय चोखारे यांनी केले. वणी येथे वसंत जिनिग लॉन मध्ये या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला होता. रंगनाथ स्वामी पथ संस्था व वसंत जिनिंगचे अध्यक्ष ऍड देविदास काळे व नाट्य, सिने अभिनेते , दिग्दर्शक संतोष चोपडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी महिला एकांकिका स्पर्धेत द्वितीय पारितोषिक प्राप्त करणाऱ्या सोनल टिकले, कविता सातपुते, लीना गुप्ता, त्रिरत्ना मजगवळी, सुनंदा गुहे या सर्व कलावंतांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन माधवराव सरपटवार यांचे हस्ते गौरविण्यात आले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......