WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मुक्या प्राण्यावर करतात अशीही माया !

ImageImage

प्रतिनिधी प्रसाद नावलेकर

वणी यवतमाळ रोडवर लालपुलीया परिसरात रोडच्या बाजूला श्री श्रीकांत डोलाईत ह्यांचे मोठे ट्रक दुरुस्तीचे गॅरेज आहे .त्या गॅरेज परिसरात एक कुत्री नवजात पिल्लासह रहात होती .चार पिल्लं होती .काही दिवसांनी अचानक रस्त्याने जाणाऱ्या वाहनाने कुत्री चा जीव घेतला !

पिल्लं अनाथ झाली सैरभर पळायला लागली ,भुकेने ओरडू लागली .ही गोष्ट गॅरेज चे मालक आणि सहकार्याचे लक्षात आली ,त्यांनी एक भला मोठा पीजरा तयार करून त्यात पिल्ले ठेवून आजूबाजूला पोटे व पृष्ठ लावून त्यांना मायेची ऊब दिली .त्यांचे खाण्याची व्यवस्था केली .त्यांना पिंजऱ्यात ह्यासाठी ठेवले ते जर रोडवर गेले तर त्यांचे जीवन संपायला नको! किती उद्दात विचार ! त्या पिल्लांची आई जाऊन अंदाजे एक महीना झाला पण ते पिल्ल छान गुबगुबीत आहेत.

शी करायची असल्यास ते ओरडतात त्यांना बाहेर सोडले जाते आणि पुन्हा बंदिस्त केले जाते .त्या गॅरेज मधील व परिसरातील सहकारी दूध,बिस्कीट,ब्रेड,पोळी आणून टाकताना पाहिले ते पिल्लं पण खूप गुबगुबीत होती त्यांना त्यांचे आई नाही ह्याची जाणीव ह्या लोकांनी होऊ दिली नाही म्हणून मी श्री श्रीकांत डोलाईत ह्यांचे अभिनंदन केले !

माणस माणसाचा जीव घेण्यास मागे पूठे पहात नाही तिथे अनाथ पिल्लांना सांभाळणारे माणस पहीली आणि मी गदगदलो !

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.