WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिरीन इंजेक्शन व औषधी साहित्य उघड्यावर, जीवितास धोका... शर्मा चौपाटी परिसरातील प्रकार

Image

कारवाईची गरज, संबंधित विभागाचे दुर्लक्ष....

- प्रतिनिधी सुरज चाटे

वणीतील प्रभाग क्रमांक 12 मधील भाग्यशाली गणेशोत्सव मंडळ परिसरातुन शर्मा चौपाटी कडे जणाऱ्या (गल्लीत) इंजेक्शन शिरीन, औषधी, गोळ्या आदि साहित्याची विल्हेवाट न लावता सदर साहित्य उघड्यावर फेकले असल्याचा प्रकार निदर्शनास आला असून याठिकाणी मोठी रेलचेल असते व गाई, ढोर, वेडे, शाळकरी मुलं आदींचा संचार असतो, असे असताना हे साहित्य नेमके कुणी टाकले असावे? मेडिकल किंवा दवाखाना यांचा तर हा प्रकार नाहीना किंवा घरगुती आहे काय? यावर प्रश्न चिन्ह असून सदर प्रकार जीवावर बेतणारा असून सुद्धा संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे जणू सदर विभाग गाळ झोपेत असल्याचे जनतेच्या निदर्शनात येत आहे.

दवाखाना असो की मेडिकल याना मुदतबाह्य औषधी नष्ट किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावावी लागते परंतु शर्मा चौपाटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर गहुकर यांच्या घरासमोरील बोरिंग जवळ मोठ्या प्रमाणात लोकांची रेलचेल असलेल्या गल्लीत अत्यंत गैरपद्धतीने शिरीन, इंजेक्शन, गोळ्या, औषधी, सलाईन आदी वस्तू उघड्यावर टाकल्या आहे. परंतु हा प्रकार कोण करतो यावर प्रश्नचिन्ह असून अशांवर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

सदर परिसरात दवाखाना तथा मेडिकल आहे परंतु सदर परिसरात वेड्यांचे सुद्धा प्रमाण असून वेड्याने किंवा लहान शाळकरी विद्यार्थांने याचा दुरुपयोग केल्यास यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहेत, तसेच संबंधित विभाग मात्र झोपेच्या गोळ्या खाऊन गाळ झोपेत असल्याचे सुद्धा नागरिकांकडून बोलल्या जात आहे साधा फेरफटका सुद्धा मारताना संबंधित विभागाचे अधिकारी दिसत नसून अशा प्रकारावर आळा घालण्याची गरज सदर प्रकार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरात जोर धरत आहे.

मला सुई रुतली...आयुष रोगे, वय -१२ वर्ष मी या मार्गाने शाळेचा जाण्या येण्याचा मार्ग असल्याने सतत प्रवास करतो परंतु दर 10 दिवसांनी या ठिकाणी असा प्रकार दिसतो मला या ठिकाणची सुई रुतली व गंभीर इजा झाली होती आता मले काही झालं असतं मंग मी का केलं असतं यायले समजाले पाहिजे कारवाई करा लवकर.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले