WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अडेगाव येथे भव्य नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

Image

महापरिनिर्वाण दिन व मंगेशभाऊ पचाभई जन्मदिन औचित्य....

-प्रतिनिधी/संघर्ष भगत (wanicity.com)

‘समाजसेवा हीच ईश्वरसेवा’ हेच ब्रीद वाक्य अनुसरून महामानवाला वंदन करून आज दि. ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचा औचित्य साधून व रक्तदूत मंगेशभाऊ पाचभाई यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नेत्रातपासणी शिबीर आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले. या ‘महापरिनिर्वाण दिनी’ दत्त मंदिर येथे युवा समाजसेवेच्या सर्व सदस्यगणांनी मिळून हा संपन्न केला. या शिबिरामध्ये झरी जामनी तालुक्यातील विभिन्न परिसरातून रुग्ण महिला व पुरुष आले . यात अडेगाव, मुकुटंबन, खातेर, आमलोन आणि लहान मोठ्या सर्व गावांमधून जनसामान्य लाभार्थी या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपले नेत्र तपासून घेतले.

या शिबिराला समता फाऊंडेशन मुबंई यांच्या माध्यमातून आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) याचे सहकार्य लाभले. जवळपास शिबिरामध्ये 336 महिला पुरुषांनि आपले नेत्र तपासून घेतले व 9 डिसेंबर सोमवारला सर्व रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया साठी पाठवल्या जाईल.

रुग्णालयाचे कर्मचारी डॉ. वंदना पंजवाने, डॉ. आकांक्षा बेले, डॉ.निकुश धांडे, मुरलीधर उमाटे (वैद्यकीय समाजकार्यकर्ते), गंगाधर तडस (वैद्यकीय समाजकार्यकर्ते), सुरेश चरडे (वैद्यकीय समाजकार्यकर्ते) आदींचा योगदान या शिबिराला गावातील जेस्ट मंडळी जनार्धन मोहितकर,सुरेश वराटे ,तुकाराम पा.सूर,बबन पारखी,सुधाकर लालसरे,वाघूजीगुरुजी उरकुडे, धनंजय पाचभाई, उत्तम पाचभाई, दादाजी चिंने, नामदेव वनकर, नरेंद्र काटकर, (डुडलू) याचे मोलाचे योगदान या शिबिराला लाभले. यावेळी युवा समाजसेवा ग्रुपचे विजय लालसरे, संतोष पारखी, गणेश पेटकर, विलास देठे, राहुल ठाकूर, प्रणल गोंडे, महेंद्र पाल, खुशाल पारखी, विकास पारखी, राकेश किंनेकर, रवीद्र चिंचुलकर, विजय भोयर, देवानंद पाचभाई, दत्ता लालसरे, दिनेश गेडाम, सुरज पेटकर, दिनेश जीवतोडे, सुरज डहाके, संदीप झाडे, सुरज मशिरकर, योगेश बेलेकर, गणेश बुरडकर, गिरीधर राऊत, गजानन हुलके, शंकर पत्रकार, दिगंबर पाचभाई, प्रदीप पेटकर व समस्त गावकाऱ्यांच्या उपस्थित शिबिर संपन्न झाले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.