WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ही महिला फक्त त्या व्यक्तीला दिसली ज्या व्यक्तीने खरच माणसात देव पाहीला

ImageImage

हे सुद्धा माणसं आहेत...यांचे जगणे सुद्धा मान्य करा ना!

-हितेश दादा बनसोड (सावनेर जिल्हा नागपूर)

वणी- यवतमाळ जिल्ह्यातील ‘वणी बहुगुणी’ अशी ओळख असलेल्या तालुका वणी येथे किमान पंधरा वर्षापासून रस्त्यावर वावरणाऱ्या वेडसर महिलेकडे कदाचित लक्ष नसतं. कधी असतं आपण त्यांच्याकडे पाहून तितकस महत्व देत नाही. याला कारण, कुठेतरी माणुसकी संपत चालली आहे. असं म्हणतात पण मात्र, एकीकडे माणुसकी अजूनही कायम आहे. असं एक उदहारण वणी शहरात पहायला मिळाले. आज मनुष्यप्राणी जिवंत माणसाला सोडून हा समाज दगडांमध्ये देव शोधत आहे, अरे खरे देव तुमच्या आसपासच भटकतात, पण कधी ओळखू येत नाहीत. ज्या दिवशी तुम्ही जिवंत माणसांमध्ये देव शोधाल त्यावेळेस चित्र जरा काही वेगळं असेल नाही का!

ही महिला फक्त त्या व्यक्तीला दिसली ज्या व्यक्तीने खरच माणसात देव पाहीला. सोनाली काळे आमच्या फेसबुक मैत्रीण आहेत काही दिवसांअगोदर ताईने व्हाट्सअपला मला या महिलेचा फोटो पाठवला सदर महिलेबद्दल माहिती दिली कामाचा व्याप जास्त असल्याने जाण्यासाठी थोडा उशीर झाला. बरेचदा असं होतं फोटो पाठवणारा फोटो पाठवून देतो नंतर आम्ही तिथे गेल्यावर साधा कॉल सुद्धा उचलत नाही असं होत असतं, पण ताई बद्दल जरा वेगळेच घडले. सकाळी पहाटे ताईला कॉल केला, आम्ही तर वणीला रात्री दीड वाजता पोहोचलो होतो. पण इतक्या रात्री कॉल करून हिला बोलावणे योग्य वाटले नाही. म्हणून आम्ही गाडी मध्येच आराम केला. सकाळी कॉल ताईचाच आला नंतर आम्ही त्या महिलेला घेण्यासाठी ज्या ठिकाणी राहायची तिथे गेलो. थोडी तापट स्वभावाची असल्याने सुरुवातीला तिने बोलणे टाळले. लगेच गाडीमध्ये टाकून तिला आतमध्ये घेतले. घाबरलेली महिला तिने गाडी मध्येच संडास करून टाकली, पण अशा वेळेस सुद्धा माझे मित्र तिच्या सोबत बसले हे कौतुकास्पद आहे.

त्यानंतर ताई सोबत बोलणे करून आम्ही गावी परत जाण्यासाठी निघालो असता, ताई बोलली दादा मी एटीएममधून तुम्हाला पैसे काढून देते. असं कळते की, सोनाली ताई एका प्रायव्हेट शाळेमध्ये पाच हजार महिन्याने काम करतात. यावेळी ताईने पाच हजार रुपयाची मदत केली. स्वतःचं लहान मुलगा घरी सोडून काही नातं नसतानासुद्धा त्या महिलेसाठी तू आली व तुझा जीव दुखला, या मानवधर्माला आमचा सलाम. तसेच या कार्यात मला छत्तीसगड येथील जीवनदीप फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र दादा यांनी 1500 रुपयाची मदत केली होती. त्यांना सुरवातीला पेट्रोल टाकण्यासाठी मी स्वतः त्यांना पैसे मागितले होते. असे हितेश दादा बनसोड यांनी सोशल माध्यमातून म्हणाले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.