WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लोकमान्य टिळक महाविद्यालयात स्वयम् आणि गूगल क्लासरूम कार्यशाळा संपन्न.

Image

महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे संगणकीय ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्याच्या सातत्यपूर्ण, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपयोगासाठी लोकमान्य टिळक महाविद्यालयात स्वयम् आणि गूगल क्लासरूम कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये पहिल्या सत्रात प्रा. राजेश भोयर यांनी क्लास विविध अंगांचे सोदाहरण स्पष्टीकरण केले.

तर दुसऱ्या सत्रात प्रा. सुहास पाचपांडे यांनी मानव संसाधन विकास मंत्रालया द्वारे संचालित स्वयम् या बद्दल विविधांगी निरुपण सादर केले.या उपक्रमाचा महाविद्यालयाच्या शिक्षकवर्गाकरिता असलेले विविध उपयोग उलगडून दाखविले.

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी या उपक्रमांचे महत्त्व आणि आगामी काळात येणाऱ्या अनिवार्यतेला प्रस्तुत करीत सगळ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक विभाग प्रमुख प्रा. होमराज पटेलपैक यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंत त्रिवेदी यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......