WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नगर सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम गावकर्यांनी केले अभिनंदन!

Image

मारेगाव तालुक्यातील मच्छिंद्रा येथे ७ डिसेंबर २०१९ शनिवारला नगर सेवा समितीने ५० गरजू व व्रुद्धाना ब्लॅकेट वाटप करून थंडीच्या दिवसात मानवतावादाचा परिचय करून दिला.

या कार्याकरिता मा.विजयबाबू चोरडीया यांच्या योगदानातून ब्लॅकेट प्राप्त झाली होती.नगर सेवा समितीने मागील दोन वर्षापासून ग्रामीण भागातील लोकांना थंडीच्या दिवसात ब्लॅकेट वाटप करीत आहे.

नगर सेवा समिती गेल्या सात वर्षापासून हिवाळ्याच्या दिवसात वणी शहरात रात्री १० ते २ वाजेपर्यंतच्या कालावधीत संपूर्ण शहर फिरून निराश्रीत ज्या ठिकाणी झोपलेले असतील त्याच ठिकाणी अंगावर ब्लॅकेट टाकून थंडीपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

या ब्लॅकेट वाटप कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून मच्छिंद्रा गावाचे सरपंच तुळसाताई कुमरे,प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच श्रीधर पेंदोर, ऋषी मत्ते,शाळा व्यवस्थापन समिती सभापती प्रविण झाडे, नगर सेवा समितीचे संस्थापक दिलीप कोरपेनवार, राष्टूपती पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक रमेशजी बोबडे, गुलाबरावजी खुसपुरे, अरूण कावडकर, क्रुष्णराव ठवकर, रविंद्रजी जुवारे, सागर जाधव, मुख्याध्यापक जेवूळकर सर यांच्या उपस्थितीत ब्लॅकेट वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

ब्लॅकेट वितरण कार्यक्रम यशस्वीतेकरिता चट्टोमिस्री,बरडे,आकाश कुमरे,सोमय्या, परचाके,मिलमिले यांनी परिश्रम घेतले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुभाषजी आडे यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......