WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शेतकऱ्यांच्या शेतातून कापूस चोरी, चोरटे आजुबाजुच्या खेड्यामध्ये धुमाकूळ

Image

शहर प्रतिनिधी

मारेगांव- शेतकऱ्याच्या शेतामधुन चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस कापूस लंपास केला. शेतकरी प्रकाश श्रीनिवास जोगी सकाळी शेतीकडे गेले असता ही बाब उघडकीस आली. यावर्षी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची कंबर आधिच मोडले आहे. करणवाडी,नरसाळा, घोडदरा या गावांच्या शिवारा लागून असलेल्या त्यांच्या शेतातील कापूस गावाजवळील चोरट्यांनीच चोरल्याचा संशय व्यक्त करत आहे

शेतकऱ्याची कापसाच्या उत्पन्नातही मोठ्याप्रमाणात घट झाली असुन जगाचा पोशिंदा कर्जाच्या खाईत लोटला जात आहेत अशातच मोठ्या कष्टाने लावलेल्या कपाशीचे भुरट्या चोरांकडून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या अंधारात कापुस चोरून तो खेड्यातील खरेदी धारकांना विकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहेत.

करणवाडी येथील शेतकरी प्रकाश श्रीनिवास जोगी यांनी मारेगांव पोलीस स्टेशनला तक्रार देताना नरसाळा, करणवाडी, घोडदरा या गांवाच्या शिवा लागुन असलेल्या त्यांच्या शेतातील कापूस गावाजवळील चोरट्यांनीच चोरल्याचा तक्रार.केली आहे. तसेच परिसरात खेड खरेदी सुरू असुन ज्यांचेकडे शेती नाही तेही कापूस विकताना दिसत आहे. या प्रकारची चौकशी करून खेडा खरेदी धारकांना सुचना देण्यात याव्या कि यांच्याकडून कापूस घेण्यात येऊ नये तसेच या भुरट्या चोरांच्या चोरीला आळा.घालण्यात यावे अशा प्रकारची प्रकारची तक्रार देण्यात आली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले