WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ऍसिड हल्ला, सहा तासात आरोपी जेरबंद

Image

गोंदिया पोलिसांच्या कामगिरीवर अभिनंदनाचा वर्षाव

गोंदिया- जिल्यातील खळबंदा तालुक्यातील तरुणीवर काल अॅसीड हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोर फरार असल्याने या हल्ल्याची नेमके गुढ का्य हे गुलद्स्त्यात होते. परंतु पोलिसांनी अरोपींंना पकडण्यासाठी कंबर कसली आणि फरार अरोपीला अवघ्या सहा तासात अटक केली.

खळबंदा तालुक्यातील सदर तरुणी नागपुर येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. सुट्टीच्या निमित्ताने ती गावाला आली होती. दिनांक 18 डिसेंबर रोजी ती बँकेच्या कामानिमित्त एम आय डी सी मुंडीपारला आली असता ती बसस्थानकाजवळ एकटी उभी होती. याच दरम्यान काळ्या रंगाच्या दुचाकीवर तोंडाला कापड व डोक्यात हेलमेट घालून आलेल्या तरुणांनी तिच्यावर दुपारी 1 वाजताच्या दरम्यान अॅसीड हल्ला करुन पोबारा केला.

सदर तरुणीच्या चेहऱ्यावर व शरीराच्या काही भागावर गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून अरोपिविरुद्ध शोध यंत्रणा सुरु केली. चार वेगवेगळ्या पथकाने तपास जलद गतीने केला. तेव्हा या अॅसिड हल्ल्याचे गुढ रहष्य समोर आले. अटकेतील अरोपीने एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केला असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी मुलीबरोबर शिक्षण घेत असताना तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. सदर तरुणाला गंगाझारी येथून ताब्यात घेतले तर दूसरा साथीदार धामनेवाडा येथून अटक केली आहे.

पोलिस अधीक्षक मंगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांनी तपास करून अरोपिंना जेरबंद केले व अॅसीड हल्लेखोरांना सहा तासात जेलची हवा दाखवली. या उत्तम कामगिरीत गंगाझरी पोलिस निरीक्षक राहुल शिरे, स.पोलिस नि. रमेश गर्जे, अतुरकर, धुमाळ, उरकुडे पोलिस उपनिरीक्षक तेजस मेश्राम, पो.कर्मचारी विजय रहांगडाले, गोपाल कापगते, धनंजय शेंडे, रेखालाल गौतम, लिलेन्द्र बैस, कोडापे, देशमुख,कर्पे, मारवाडे, शेंदरे, दमाहे, पालान्दुरकर, बैरय्या, भेलावे आदिनी सहभाग घेतला होता.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......