WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चिखलगाव शेतशिवारात तरुणाचा मृत्युदेह आढळला

Image

हातावर ‘सुनील’ नाव गोदवलय, अंगात निळसर शर्ट व पँट

-शहर प्रतिनिधी

वणी- शहरालगत चिखलगाव येथील शेत शिवारात एका तरुणाचा मृत्युदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. चिखलगाव येथील गोरंटीवार यांच्या शेतालगत पांदन रस्ता आहे त्या रस्त्यावर अनोळखी तरुणाचा मृत्युदेह आढळला. अंदाजे तरुणाचे २५ ते २६ वर्ष असावे. गणेशपुर येथील पोलिस पाटिल यांना दि. २२ डिसें. रोजी चार वाजताच्या सुमारास माहिती मिळाली असता पोलिस पाटिल कौरासे यांनी तत्काळ घटनास्थाली धाव घेतली आणि आजुबाजुला चौकशी करुन सदर घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. मृतक हा अनोळखी असल्याचे गृहीत धरून मृत्युदेह शवविछेदनासाठी पाठवण्यात आला.

मृताकाची तपासणी अह्वालातुन खरी ओळख पटेल असे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी या अनोळखी तरुणाची ओळख पटण्याकरिता अंदाजे वय वर्ष २५, रंग सावळा, बारीक़ दाढ़ी, अंगात घातलेले निळसर शर्ट व फुल पँट, उजव्या हातावर ‘सुनील’ असे लिहिलेले असून हातात स्टील कडे घातलेले आहेत. मृतक तरुणाच्या गळ्याला व हाताला मार लागलेला आहे. त्यामुळे विविध चर्चेला परिसरात बिंग फुटले आहे. गणेशपुर येथील पोलिस पाटिल श्री. बबन कौरासे यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना देऊन, वणी पोलिसांनी त्या अनोळखी इसमाचा १७४ जा. फौजदारीनुसार नोंद घेतला असून पुढील तपास पोलिस हेड कॉ. व्ही.एस. बुर्गेवार यांना देण्यात आला आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......