WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सट्टा किंग'चा विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, बोर्डा चौकात थरार

Image

घाव गंभीर, डोक्याला २७ टाके पडले....!!

वरोरा- तालुक्यालगत बोर्डा गावातील शिबू विस्वास नामक सट्टा आणि अवैध दारू विक्रेता हा किंग म्हणून ओळखला जातो, या सट्टा गैंगने एका विद्यार्थ्याला बोर्डा चौकात लोखंडी रॉडने वार केला. यात सुमित बागेसर हा गंभीर जखमी झाला आहे. या शिबूची बोर्डागावासह शहरात ही चांगली पकड असल्याने त्याची दहशत वाढली. पोलिसांसोबत घप्प असल्याने दिवसेंदिवस दादागिरी दाखविली जाते असे स्थानिकातुन सांगण्यात येते. दि.२३ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ च्या सुमारास सट्टाकिंग विस्वास आणि त्याचा पंटर या दोघांनी सुमितवर लोखंडी रॉडने वार केला यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सुमित याला स्थानिक उपचार करुन सेवाग्राम ला हलवण्यात आले. हल्ला जोरदार असल्याने त्याच्या डोक्यावर घाव गंभीर असून २७ टाके पडले असल्याची प्राथमिक बातमी आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात ३२४ अंतर्गत गुन्हा नोंदवून ही अद्याप आरोपीला अटक केली नसल्याचे जखमीच्या कुटुंबीयांनी आरोप केला. शिबू विस्वास हा परप्रांतीय असल्याचे बोलले जात आहे. सध्या बोर्डा स्थित वरोरा परिसरात अवैध धंदा करतो आहे. आर्थिक पाठपुरवठा संबधितांना देत परिसरात व प्रशासनात चांगली मिलीजुली असल्याने त्याचा कोणी वाकड करू शकत नाही. म्हणून दिवसेंदिवस दहशत या गँगची फोफावली आहे. जखमीला न्याय मिळतो का? असे कुटुंबासह नागरिकांचे याकडे लक्ष लागले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.