WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपूर येथे झालेल्या स्पर्धेत वणीच्या बाल कलावंतांनी पटकाविले द्वितीय पारितोषिक .....

Image

शहरातील सागर झेप बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून बाल कलावंत घडवण्याचे कार्य करत आहे. या वर्षी उन्हाळ्यात नाट्य शिबिर घेण्यात आले, नवीन बाल कलावंत तयार झाले असून शहरात नाट्य कला पुन्हा जिवंत झाली आहे. या वर्षी प्रथमच बाल नाट्य स्पर्धेत वणीच्या बाल कलावंतांनी सहभाग घेतला असून 4 बक्षिसे पटकावली आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बाल नाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. वणी शहरातून दोन बाल नाट्यने सहभाग घेतला असून दोन्ही नाटकाचे दिग्दर्शन सागर झेप संस्थेचे अध्यक्ष सागर मुने यांनी केले. डॉ माणिक वड्याळकर लिखित " मला तुका व्हायचं आहे " या नाटकाला स्पर्धेत दुसरे पारितोषिकासह प्रमाणपत्र व रोख 2000 मिळाले आहे. तसेच उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून द्वितीय क्रमांक सागर मुने यांनी प्राप्त केला आहे. गौरी जयंत सोनटक्के हिला उत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय क्रमांक व लीना राजेश गुप्ता उत्कृष्ट अभिनेत्री तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या नाटकात त्रिरत्ना मजगवळी, निकुंज सातपुते, शांतनू आंबोरकर, श्रुती कोठे, तमन्ना गुप्ता, पारस टिकले, माही खुसपुरे, नंदिनी बावणे, वंशिका ताजणे, सौम्य टिकले, संयुक्ता ढवळे, सोनाक्षी खुसपुरे यांनी वेगवेगळ्या भूमिका उत्तमरीत्या साकारल्या त्यामुळे नाटकाला हे यश प्राप्त झाले.

" चाकलेटचा बंगला " हे दुसरे नाटक चंद्रपूर येथे झालेल्या स्पर्धेत स्पर्धेत सहभागी होते. या नाटकाचे लेखक प्रवीण चौघुले असून अवधूत काटकर,शास्वती बुरडकर, मानव निब्रड, कृतिका घाटे, गार्गी पिसे, रुणाली दोरखंडे, रुद्राणी सोनूले या बाल कलावंतांनी सादर केले होते.

नाटकाला परद्या मागची भूमिका खूप महत्त्वाची असते. दोन्ही नाटकाला पार्श्वसंगीत सागर मुने, प्रकाश योजना वैशाली पिसे, रंगभूषा व वेशभूषा पौर्णिमा पांडे, रंगमंच व्यवस्था संदीप दोरखंडे, राजू खुसपुरे, संजय कालर, यांनी केले. तांत्रिक सहकार्य कल्पना सोनूले, अनिता सोनटक्के , नेत्रादीपा कोठे, उज्जवला ढवळे, संगीता बुरडकर, रेखा गुप्ता या सर्वांच्या सहकार्यामुळे यश प्राप्त झाले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.