WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

डॉक्टरकडून तरुणीवर सतत अत्याचार, परवाना रद्द करून फाशीच्या शिक्षेची मागणी

Image

कोरपना, गडचांदूर, नांदा फाटा, दुकाने बंद

शहर प्रतिनिधी/ रफिक शेख (गडचांदूर)

गडचांदुर- कोरपना तालुक्यातील तरुणीवर डॉ. आकाश जीवने यांनी घृणास्पद कृत्य केले. त्या विरोधात आज कोरपना, गडचांदूर, नांदा फाटा येथे बंद पाडून या घटनेचा जाहीर निषेध करत त्या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने ठाणेदार पोलीस स्टेशन कोरपना यांना देण्यात आले.

डॉ. जीवने नारंडा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांनी कोरपना येथे स्वतःच्या खाजगी रुग्णालयात पीडित युवती सन 2016 पासून काम करत होती. सदर युवतीला आमिष दाखवून मोहजाळात पडून डॉ. जीवने पिडीतेवर सातत्याने अत्याचार करीत होता.पीडितेचे अश्लील छायाचित्र काढून युवतीला ब्लॅकमेल करून शरीर सुखाची मागणी करायचा.बदनामीच्या भीतीने पीडिता अत्याचार सहन करत होती.

पीडित युवतीचे काही दिवसांपूर्वी लग्न जुळले. याविषयी डॉ. जीवने यांना माहिती होताच या नाराधमाने पीडित युवतीचे अश्लील छायाचित्र तिच्या भावी पतीला मोबाईलवर पाठवले. एवढ्यावरच न थांबता तिच्याशी लग्न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सदर युवतीच्या भावी पतीने लग्नास दिला. या घटनेमुळे तरुणीच्या कुटुंबावर आभाळ कोसळले व त्यांची समाजात नाहक बदनामी झाली.

अत्याचारी डॉ. जीवनेवर पोलीस स्टेशन कोरपना येथे भांदवी ३७६, ३७६/२ व आय.टी.सी. ऑक्ट ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बलात्कारी नराधमाचा वैद्यकीय परवाना रद्द करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ (समस्त नाभिक समाज) चंद्रपूर यांच्यातर्फे निवेदनातून करण्यात आली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......