WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

'ऊर्जा -२०१९ विज्ञान प्रदर्शनी ... देश घडविण्यात विद्यार्थ्यांचे योगदान ....वैभव जाधव

Image

सागर मुने,वणी

येथील स्वर्णलीला इंटरननॅशनल स्कूलमध्ये 'ऊर्जा -२०१९ भाषा , गणित , विज्ञान व सामाजिक शास्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते . या विज्ञान प्रदर्शनात वर्ग १ ते १२ वीच्या विध्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. प्रदर्शनाचे उदघाटन वणीचे पोलिस निरीक्षक वैभव जाधव यांनी केली . यावेळी अध्यक्ष्य क्रिशन जैन , प्राचार्य सी.सीवारामाकृष्णा, उपप्राचार्य मंगेश आवारी उपस्थित होते.

नवीन तंत्रज्ञानाचा शोध अशा विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनातून होतो. विद्यार्थी हे देशाच्या विकास कामात महत्वाची भूमिका पार पाडतात. या माध्यमातून नवीन वैज्ञानिक तयार होतात. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. साधारणतः 700 च्या वर मॉडेल्स या प्रदर्शनात होते.

या विज्ञान प्रदर्शनात भाषा, सौर ऊर्जा, दळणवळण आधुनिक तंत्रज्ञान, ऊर्जा पुनर्वापर , जैवविविधता, हरित ऊर्जा, मूल्यशिक्षण, सामाजिक शास्त्र या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. स्वप्नील कुलकर्णी, उपप्राचार्य अमित काळे , नरेंद्र लोखंडे ( गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल, पांढरकवडा) ह्यांनी परीक्षण केले. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पाहुणांच्या हस्ते गौरवन्वित करण्यात आले . शाळेचे अध्यक्ष क्रिशन जैन, प्राचार्य सी. सीवारामाकृष्णा यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली पिल्ले,जान्हवी सांबरे या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर ठाकरे व नीरजा खोकले यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य मंगेश आवारी यांनी केले . यशस्वितेकरिता सर्व शिक्षकवृदांनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी सहकार्य केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......