WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शहरात अवैध रेती साठा जोमात ....महसूल विभाग कोमात....

ImageImage

सागर मुने, वणी

शहरात सध्या रेती साठा खूप जोमात सुरू आहे. मोकळ्या जागेत रात्री रेती साठा करण्यात येतो व दिवसा ती रेती बांधकामाला टॅक्टर ने पुरवठा करण्यात येतो. चंद्रपूर जिल्ह्यातील रेती वणी शहरात येते अशी माहिती महसूल प्रशासनाने दिली.

वणी शहरात बांधकाम खूप जोमाने सुरू आहे एकाच परवाना वर अनेक ट्रिप रेती आणतात, त्यांच्यावर कोणतीच कारवाई प्रशासन करत नाही. दुसऱ्याच्या जागेत रेती साठा करतात, मात्र ज्याच्या जागेवर रेती आहे त्याच्यावर कोणतीच कारवाई का करण्यात येत नाही.

काही दिवसांपूर्वी गंगाशेट्टीवर मंगल कार्यालय परिसरात अवैध रेती साठा व jcb जप्त केला पण त्या जागेच्या मालकावर कोणतीच कारवाई केली का नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बांधकाम दुसरी कडे व रेती टाकतो दुसरीकडे अशी उत्तरे महसूल विभागाच्या उडवा उडवीचे उत्तर देतात. पाणी कुठे मुरत आहे, याच उत्तर मिळणे कठीण दिसते. अवैध रेतीची रायल्टी व त्याची मलाई नेमकं कोण खात आहे. हा प्रश्न उपस्थित होतो.

साई नगरी येथे मोकळ्या जागेत रेती साठा केला आहे व सिटी पॉईंट बीअर च्या बाजूला चिटलवर बिछायात च्या समोररेती आहे तसेच नांदेपरा रोडवरील प्रिन्स बारच्या बाजूला मोकळ्या जागेत दोन महिन्या पासून रेती पडून आहे. या बाबत तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना माहिती मिळाली आहे. आता कारवाई करतात काय याची जनतेला उत्सुकता लागली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.