WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नागरिकत्व संशोधनाच्या समर्थनार्थ भव्य रॅली...

Image

सागर मुने,वणी

केंद्र शासनाने पाकिस्थान, बांग्लादेश व अफगाणिस्थान या देशातील पीडित हिंदू, बौद्ध, शीख व त्या देशातील इतर अल्पसंख्याकांना जे 2014 पूर्वी या देशात आले त्यांना नागरिकत्व देण्याचा कायदा संसदेने मंजूर केला. या नागरिकता संशोधन अधिनियम च्या समर्थनार्थ दि. 2 जानेवारीला येथील शासकीय मैदानावरून 12 वाजता भव्य रॅलीचे आयोजन राष्ट्रहित संवर्धन समिती तर्फे करण्यात आली आहे.

नागरिकता संशोधन अधिनियम (CAA) च्या संदर्भात मोठया प्रमाणावर सुरू असलेल्या चुकीच्या माहितीमुळे मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण झाले आहे. तो गैरसमज दूर करून नेमकी खरी स्थिती काय आहे, हे समजावून सांगण्यासाठी या भव्य रॅलीच्या आधी या अधिनियमांची वास्तवता उपस्थितांना समजावून सांगण्यात येणार आहे. या देशहिताच्या निर्णयाला समर्थन देऊन संपूर्ण समाज मन जाग करण्यासाठी या अभूतपूर्व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर संशोधन विधेयकाचा उद्देश काय आहे. भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व धोक्यात आले आहे का?, या देशातील नागरिकांना निर्वासित करण्यात येणार आहे का? या व इतर सर्व प्रश्नांचे या निमित्त समाधान करून जनजागरण करण्यात येणार आहे. नागरिकता संशोधन अधिनियमाच्या समर्थनार्थ या भव्य रॅलीत देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रहित संवर्धन समिती वणी तर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.