WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दूषित पाण्याचा पुरवठा.. नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Image

सागर मुने,वणी

वणी शहरात पाण्याचा प्रश्न जैसे थे दिसत आहे. उन्हाळा सुरू वायचं आधीच पाणी पुरवठा कमी होत आहे. नांदेपेरा रोड वरील पोस्ट कॉलनी परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील एक महिन्यापासून पाणी पुरवठा योग्य होत नाही. या बाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य खूप धोक्यात आले आहे. शहरात दोन दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र ते पाणी खूप घाण असते . नालीच्या पाण्याचा दुर्गंन्ध येतो. त्यामुळे पाणी बाहेरील वापरण्या अयोग्य असल्याने, हे पाणी पिण्यासाठी वापरायचे कसे, आरोग्य धोक्यात आल्याने , पाण्या वीणा जगायचं कसं हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वणी नगर परिषद योग्य पाणी पुरवठा करण्यास का ? अकार्यक्षम आहे. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले