WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी तालुका स्तरीय निष्ठा प्रशिक्षणास सुरूवात....

Image

सागर मुने, वणी

वणी पं.स.अंतर्गत जि.प.,न.प.व शासकिय शाळेत कार्यरत असलेल्या ईयता 1 ते 8 ला शिकवित असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या पहिल्या टप्याचे प्रशिक्षण दि. 30 डिसेंबरला सुरू झाले. प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई पावडे, गटविकास अधिकारी राजेश गायनार , अनिल ठोकळ डायट यवतमाळ, जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक घावडे , राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार, राजेंद्र कोरडे केंद्रप्रमुख, नवनाथ देवतळे केंद्रप्रमुख उपस्थित होते.

शालेय शिक्षणातील गुणवत्ता वाढविणे या मुख्य ऊद्देशाने सुरु झालेले हे प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण करून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी अधिक जोमाने काम करावे असे पाहुण्यांनी विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक लक्ष्मण इद्दे केंद्रप्रमुख यांनी केले संचलन निशा वाटेकर साधन व्यक्ती व आभार प्रदर्शन विनोद नासरे साधन व्यक्ती यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साधन व्यक्ती देवराव चिडे, अशोक कोंगरे, धनलक्ष्मी लक्षट्टीवार , अल्का काळे, सपना वासेकर, नितेश बावने, घोनमोडे, गुणवंत गौरकार यांनी सहकार्य केले.

दि. 30 डिसेंबर पासून सुरू झालेले हे प्रशिक्षण व्यवस्थित सुरू असून यात प्रशिक्षणासाठी, प्रवास भत्ता, पूर्व चाचणी व अंतिम चाचणी ऑन लाईन घेतली जात आहे. या पहिल्या टप्याच्या प्रशिक्षणाचा समारोप दि 3 जानेवारीला होणार आहे. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत वर्ग 1 ते 8 वी पर्यंत शिकविणाऱ्या सर्व जिल्हा परिषद, नगर परिषद व शासकीय शाळेतील शिक्षकांना चार टप्यात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी पहिल्या टप्यातील तिन्ही कुलात जाऊन शिक्षकांच्या चर्चेत सहभागी होऊन मार्गदर्शन केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.