WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

'दहावी बारावी नंतर काय? एक दिवशीय शिबीर संपन्न

Image

खराटे सर कोचिंग कलासेस व श्री महालक्ष्मी बहूउद्देशिय संस्थे द्वारे एक दिवशीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. 'दहावी बारावी' नंतर काय? करावे असा संभ्रम विध्यार्थ्यांना बऱ्याचदा पडतो. यावेळी प्रमुख मार्गदर्शक कमांडर मिलिंद कुमार बडगे, प्रा.विनय सोनुले अमरावती, मयंक नेगी उत्तराखंड व इकरा राजी दिल्ली उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर निवडावे असे मत प्रा.विनय सोनुले यांनी मांडले तर मिलिंद कुमार बडगे यांनी विद्यार्थ्यांना विविध करियर क्षेत्रात असलेल्या करियरची माहिती दिली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल खराटे सर, उपाध्यक्ष सचिन आयतवार, सचिव राकेश ठाकरे, सौं शीतल चिकाटे, सौं रुपाली खराटे, सौं प्रगती ठाकरे उपस्थित होत्या. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सौं.शीतल चिकते यांनी केले तर प्रास्ताविक अमोल खराटे सर यांनी केले व आभार सौं प्रगती ठाकरे यांनी मानले या कार्यक्रमात विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित दर्शविली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.