WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजूऱ्यात कर्मच्याऱ्यावर प्राणघातक हल्ला, अरोपीचे पोलिसात आत्मसमर्पण

Image

-शहर प्रतिनिधी

राजुरा- तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर आरोपीचे राजू अतकरे असे नाव आहे. ही घटना आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी सुभाष कन्नोजवार चौकात सलून चालक राजू अतकरे यांनी सुभाष यांच्याशी वाद केला असता किरकोळ वादातून अतकरे यांनी लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार केला व् जीवे मारण्याच्या प्रयत्न केला आहे. आजुबाजुला असलेल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेउन सुभाष कन्नोजवार यांना वाचवाण्यास मदत केली. मात्र हल्ला जोरदार असल्याने कन्नोजवार गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ राजुरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण मात्र प्रकृती गंभीर असल्याचे पाहून चंद्रपुर येथे हलवण्यात आले. दरम्यान, आरोपी राजू अतकरे यांनी कुठेही पोबारा न करता सरळ पोलिस स्टेशन गाठले, आत्मसमर्पण करुन गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी राजू अतकरे यांची चौकशी सुरु केली आहे असे वृत्त आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.