WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पुन्हा मारेगांव पंचायत समितीवर काँग्रेस- सेनेची सत्ता, सभापतीपदी काँग्रेसच्या शितल पोटे तर उपसभापती सेनेचे संजय आवारी

Image

राज्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडी ची मुसंडी...!!

शहर प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

मारेगांव पंचायत समितीच्या पदधिकारी निवडसाठी झालेल्या आजच्या सभेत काँग्रेसच्या शितल पोटे सभापती पदी तर उपसाभापती पदी सेनेचे संजय आवारी याची अविरोध निवड झाली मारेगांव तालुक्यात पंचायत समितीच्या चार जागा आहेत यापैकी दोन जागा काँग्रेसच्या ताब्यात असुन प्रत्येकी एक जागा सेना भाजपच्या ताब्यात आहेत यावेळी सभापती पदाचे आरक्षण महिला मागास प्रवर्गातील होते.

कोणत्याच पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने गेल्यावेळेस पासून शिवसेनेचे सदस्य संजय आवारी यांच्या मदतीने काँग्रेस पंचायत समितीच्या सत्तेत आहेत आज सुध्दा काँग्रेस शिवसेना हे दोन पक्ष एकत्र आल्याने भाजपा कडे एकच सदस्य असल्याने या निवडणूकी पासून भाजपा अलिप्त राहल्याने पदधिकारी निवडची निवड अविरोध ठरली.

सभापतीपदासाठी काँग्रेसच्या शितल पोटे आणि उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे संजय आवारी यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दिपक पुंडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर संजय बारस्कर यांनी या दोघाची अविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले