WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

झरी जामनी पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता राजेश्वर गोंड्रावार सभापती तर लताताई आत्राम उपसभापती.

Image

प्रतिनिधी: रोहन राजु आदेवार

झरी: झरी जामनी पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी झालेल्या आजच्या सभेत राजेश्वर लक्ष्मण गोंड्रावार यांची पं स झरी सभापती पदी निवड. तर लताताई आनंद आत्राम यांची उपसभापती निवड.

पंचायत समिती चार सदस्यांची असून यामध्ये राजेश्वर गुंडावार भाजपा, लताताई आत्राम भाजपा तसेच प्रणिताताई घुगुल शिवसेना, नागोराव पुरवते कांग्रेस हे सदस्य होते.

जन्म कुठे घ्यावा हे जरी आपल्या हाती नसलं तरी कर्तुत्वानं मोठे व्हायचं आपल्या हाती आहे हे राजेश्वर गोंड्रावार यानी मांडवी(बोरी) च्या समाजासोबत राहून इतर गावाला दाखवलं.. राजकारण हे फ़क्त पैसेवाल्याच्या पोरानी किंवा ज्याची भावकी मोठी आहे त्यांनीच करायचं हा समज राजुभाऊनी मोडत काढत कोणताही राजकीय वारसा नसताना आज झरी पंचायत समितीच्या सभापती पदी नुकतेच वीराजमान झाले.

नेहमीच् अन्यायाच्या विरोधात लढणारे लढता लढता जरी हारलो तरी अपयश ही यशाची पहिली पायरी असते या नुसार पुन्हा नेटाने काम करण्याची ज्याच्यांत धमक असणारे गरीबीत जन्म घेऊन कष्ट हेच भांडवल समजुन कष्ट करुन यशाच्या शिखरावर असणारे गरीबीची जाण ठेऊन तरुणाना आधार देणारे स्वभाव.. शांत पण अन्यायाच्या विरुद्ध पेटुन ऊठणारे भांडण तंटा मीठवण्यासाठी पुढाकार घेणारे समाज कार्यात हिरारीने भाग घेणारे.. समाजा साठी स्वताच्या खिशाला झळ लागली तर मागे पुढे न बघणारे मोकळ्या स्वभावाने विरोधकाच्या मनात घर करणारे युवा नेते.. राजेश्वर गोंड्रावार पं स चे सभापती नसून जनतेच्या मनातील सभापती आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.