WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीचे बाल कलावंत उत्कृष्ट अभिनय करतात ....पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी दिल्या नाटकाला शुभेच्छा..

ImageImageImageImageImage

वणी सीटी न्युज नेटवर्क :-<

नागपूर येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्रालया तर्फे हौशी बाल नाट्य स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत ज्योती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने वणीतील बाल कलावंत स्पर्धेत सहभागी होत आहे.

जैताई मंदिर येथील सभागृहात " मला तुका व्हायचंय " या नाटकाची रंगीत तालीम घेण्यात आली. या वेळी नाट्य रसिक असणारे पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले होते. तसेच जेष्ठ रंगकर्मी अशोक सोनटक्के यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व प्रयोग सादर झाला आणि बाल कलाकारांचे विशेष कौतुक करीत त्यांनी मुलांना भेट म्हणून चॉकलेट देऊन नागपूर येथे होणाऱ्या स्पर्धे करीत शुभेच्छा दिल्या व लहान मुलांनी अप्रतिम अभिनय केला. तसेच ते म्हणाले माणसात अभिनय कला असल्याने व्यक्तीमत्व विकास होतो, तणावमुक्त राहतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

नाटकाचे दिग्दर्शन सागर मुने यांनी केले. जैताई देवस्थान चे सचिव माधवराव सरपटवार यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी नीलिमा काळे, संजय कालर , जयंत सोनटक्के, राजू खुसपुरे, भगवान मजगवळी व रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......