WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

'बुकलेट गाय' ने जिंकली युवकांची मने !!!!

Image

सागर मुने,वणी

'आपल्याजवळ काय आहे? यापेक्षा आपण त्याचा काय उपयोग करतो हे अधिक महत्वाचे आहे. परिपूर्ण कृतिशून्यते पेक्षा अपूर्ण कृतिशीलता अधिक सुंदर असते. मी मेल्यावर लोकांनी माझ्या बद्दल काय बोलावे? याचा मी जिवंतपणी विचार केला पाहिजे. जर मी वाचणार नाही तर मी बदलणार नाही आणि जर मी परिवर्तित झालो नाही तर मी विकसित नाही. जेव्हा केव्हा चिंताग्रस्त व्हाल तेव्हा ती सापडेल ते वाचा. त्यातून कदाचित उपाय सापडेल किंवा नाही पण चिंता दूर नक्की होईल. अशा एकाहून एक प्रेरक,अंतर्मुख करणाऱ्या, प्रेक्षकांच्या वाहवा आणि टाळ्यांना पात्र ठरणाऱ्या विचारकलिकांना सादर करित 'बुकलेट गाय ' अमृत देशमुख यांनी महाविद्यालयीन युवकांना आणि उपस्थित मानसिक तरुणांना मंत्रमुग्ध केले.

लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने साकारण्यात येत असणाऱ्या, ग्रंथ परिचयपर ' ग्रंथमनीचे गूज' या यवतमाळ येथील विख्यात स्वदेश साप्ताहिकात चालविण्यात येणाऱ्या, अभिनव उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी, वाचन संस्कृती या विषयावर ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, उपाध्यक्ष रमेश अणे, सचिव लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के तथा महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. खानझोडे यांनी छंद आणि व्यवसाय एकत्र आली तर व्यक्तीच्या जीवनात किती आनंद येऊ शकतो हे स्पष्ट करीत ग्रंथमनीचे गूज या उपक्रमाची, त्याच्या वैशिष्ट्यांसह ओळख करून दिली.

अमृत देशमुख यांनी आपल्या 'मेक इंडिया रीड' मिशनची ओळख करून देताना मी सी.ए.सोडून या विषयाकडे कसा वळलो? याची रोचक पार्श्वभूमी आपल्या खुमासदार शैलीत सादर करून, जगात असेही लोक आहेत का? असा विचार करण्यास श्रोत्यांना भाग पाडले.

माझ्या वाचनाचा इतरांना उपयोग होऊ शकतो ही कल्पनाच रोमांचकारी आहे हे सांगत, अंधमुलीच्या प्रतिक्रियेने वाटलेली जीवन सार्थकता उलगडून दाखविली.

विद्यार्थी वर्गाला अभ्यास करताना उपयोगी पडतील अशा अनेक टिपा देत शब्द किंवा मुद्दे कसे लक्षात ठेवायचे? याचे त्यांनी प्रात्यक्षिकच करून घेतले.

शेवटी डॉक्टर अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अनेक उपक्रमात हा माझा खारीचा वाटा आहे. ही त्यांची नम्रता सगळ्यांना सुखावून गेली.

अध्यक्षीय मनोगतात नरेंद्र नगरवाला यांनी वृत्तपत्रही न वाचण्याच्या काळात अशी यशस्वी चळवळ उभारणाऱ्या देशमुख यांची मुक्तकंठाने प्रशंसा करीत व्यवसायाच्या पलीकडेही काही वाचण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे तर आभार प्रदर्शन डॉ. मनोज जंत्रे यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.