WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत स्वामी विवेकानंद अभ्यासिका गटात युवा दिन व राजमाता जयंती संपन्न

Image

विद्यार्थ्यांनी भूमिका ध्येय उद्देश जपायला हवा...वैभव ठाकरे

प्रतिनिधी अमोल कुमरे-

शहरातील नगर परिषद द्वारा संचालित 'स्वामी विवेकानंद अभ्यासिका' गटात दिनांक 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती मोठया उत्साहात संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. दिलीप मालेकर सर तर प्रमुख वक्ते म्हणून पोलीस उपनिरीक्षक मा. जाधव सर व व वैभव ठाकरे उपस्थित होते. आजची युवकांची भूमिका, आजच्या युवकांसमोरील ध्येय, उद्धेश आणि आव्हाने याचे सुंदर विवेचनातून मार्गदर्शन विध्यार्थ्यांना केले. एक दिवसा अगोदर सर्व विध्यार्थ्यानी स्वच्छता अभियान राबवून अभ्यास गट व आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अक्षय काकडे व आरती तेलंग या विद्यार्थ्यांनी केले. स्वागत गीत करिष्मा नवले हिने सादर केले तर आभार आशिष खरवडे यांनी मानले या कार्यक्रमाला सर्व विध्यार्थ्यानी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले असून विध्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.