WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शेवटी 'संगमसिंग'सुखरूप घरी पोहोचला, wanicity.com ने घेतला पुढाकार

Image

कुमार अमोल -

मूळचा हरियाणा यमुनानगर जिल्ह्यातील, कुतुबपूर येथील रहिवासी 25 वर्षीय मनोरुग युवक 'संगमसिंग' मागील काही आठवड्यापासून ता. वणी, जिल्हा यवतमाळ येथे अर्धनग्नावस्थेत फिरत होता, मानसिक स्थिती बरोबर नसल्या कारणाने त्याला बोलताना ही त्रास व्हायचा. तब्बल 2 महिन्यापासून हा मनोरुग्ण युवक घरून मुळगाव येथून बेपत्ता होता. असे कळले की, हा शहरात फिरत असताना काही निर्दयी लोकांनी त्याला बेदम मारहाण करून त्याचा हात तोडला, अश्या अवस्थेत वेदनेने विव्हळत असताना अश्यातच मी व शहरातील माझे मित्र वणीसिटी डॉटकॉमचे कार्यकारी संपादक मंगल खाडे, चेतन नगराळे यांच्या लक्षात ही बाब आली. प्रथम या मनोरुग युवकाला त्याचे नाव व घरचा पत्ता विचारून भावाचा संपर्क घेऊन त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला, wanicity.com च्या माध्यमातून त्याची अंघोळीची व्यवस्था करून देण्यात आली. त्याला कपडे देण्यात आले. त्यानंतर त्याच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, यावेळी बाबाभाई सय्यद युनूस यांनी त्या युवकाला गरम कपड्यांची मदत केली, संगमसिंग चे दोन्ही भाऊ त्याला नेण्यासाठी वणी येथे मध्यरात्री दाखल झाले, त्यांची ही लॉज वर राहण्याची व्यवस्था wanicity.com मार्फत करण्यात आली व शेवटी त्याला सकाळी संगमसिंग ची त्याच्या दोन्ही भावासोबत त्याच्या मूळ गावी सुखरूप रवानगी करण्यात आली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......