WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

2 आक्टोबर ला आत्मक्लेश आंदोलन होणार ..... विदर्भ राज्य आंदोलन समितीची वणीत बैठक,

Image

सुरज चाटे वणी:- विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी वणीत आत्मक्लेश आंदोलन होणार आहे. 2 अक्टोम्बर ला संपूर्ण विदर्भात हे आंदोलन होणार असून यात विदर्भातील 11 हि जिल्हे व 120 तालुके एकाच वेळी सहभागी होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्याद्वारा दिनांक 12 सप्टेंबरला बुधवारी वणीतील विश्राम गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला प्रमुख विदर्भवादी नेते माजी आमदार वामनराव चटप उपस्थित होते. या बैठकी मध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचे यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रा.पुरुषोत्तम पाटील, पूर्व यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ऍड सुरज महातळे, यवतमाळ युवक जिल्हा अध्यक्ष राहुल खारकर, सुनील नांदेकर यांनी मनोगत व्यक्त केले. 2 आक्टोम्बर ला होऊ घातलेल्या आत्मक्लेश आंदोलनात जास्तीत जास्त व मोठ्या संख्येने विदर्भवाद्यांनी व युवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या बैठकीला देवराव धांडे, बाळासाहेब राजूरकर, मंगल चिंडालिया, शालिनीताई रासेकर, रुद्रा कुचनकर, आकाश सूर, सृजन गौरकर, संजय चिंचोलकर, गिरीश कुबडे, अक्षय कौरासे, बालाजी काकडे, रवी ढेंगळे, नारायण काकडे, नितीन तुराणकर, रोहित रणदिवे, उमेश रासेकर, अक्षय बोन्डे, प्रवीण गौरकार, आशीष घोडेस्वार, शंकर कुचनकर, गौरव जवादे, आकाश ढोरे, संकेत खिरटकर, शषांक बदखल, साईनाथ उईके, राहुल खारकर, यासह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.