WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तहसिलदारावर कारवाई करा, अन्यथा आंदोलन... राजू तुरांकर यांचा इशारा....

Image

सागर मुने, वणी

वणी महसुल विभागात रेतीघाट बंद दरम्यान वणी शहरात मोठ्याप्रमाणात अवैद्य रेती पुरवठा झाला असुन जागोजागी रेती साठे करण्यात आले.काही अवैद्य रेतीवर कारवाई झाली तर काही अवैद्य रेती साठ्यावर जप्त करुनसुद्धा कारवाई करण्यात आली नाही.परिणामी शिवसेनेचे वणी शहर प्रमुख राजु तुराणकर यांनी जप्त केलेल्या अवैद्य रेती साठा हर्रास करा व रेती तस्करांना पाठीशी घालणार्या तहसिलदार शाम धनमने यांचेवर कारवाई करा,अन्यथा प्रजासत्ताक दिनापासुन आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले आहे.

शिवसेनेचे वणी शहर प्रमुख राजु तुराणकर यांनी दि.1 जानेवारीला जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे वणीचे तहसिलदार शाम धनमने यांनी दि.17 डिसेंबर 2019 रोजी अवैद्य रेती साठा जप्त केला परंतु त्या अवैद्य रेती साठ्याबाबत कोनत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई केली नसुन रेती तस्करांना पाठीशी घालत आहे तसेच जप्त केलेल्या रेती साठ्याचा हर्रास न केल्याबाबत तक्रार केली होती.परिणामी वणीचे एसडीओ यांनीसुद्धा दि.10 जानेवारीला जप्त केलेला अवैद्य रेतीसाठ्याचा हर्रास करण्याबाबत आदेश केला आहे.परंतु तहसिलदारांनी जप्त केलेला अवैद्य रेतीसाठा हर्रास केला नाही.विशेष म्हणजे 20 ब्रास जप्त केलेल्या अवैद्य रेती साठ्यामधुन काही ब्रास रेती चोरट्यांनी राञीच्या सुमारास चोरुन नेल्यामुळेच तहसिलदार सदर रेतीसाठा हर्रास करण्याबाबत उदासीन असल्याची चर्चा आहे.परिणामी 1 महिना होवुनसुद्धा जप्त केलेल्या अवैद्य रेतीसाठ्यावर तहसिलदार कारवाई करुन रेतीसाठा हर्रास का करित नाही हा संशोधनाचा विषय असला तरी माञ आता हा विषय शिवसेनेने आपल्या रडारवर घेतला असल्यामुळे जप्त केलेला अवैद्य रेती साठा तहसिलदार हर्रास करते की शिवसेना तहसिलदाराच्या विरोधात कारवाई करिता आंदोलन करनार?याकडे वणी शहरासह परिसरातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.