WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रेस संपादक व पत्रकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी विजय बुंदेला यांची नियुक्ती

Image

मारेगाव -

दै. सिंहझेपचे जिल्हा प्रतिनिधी श्री. विजय कुमार रतनचंद बुंदेला यांची प्रेस संपादक व पत्रकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी आज नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ येथील श्री. विजय कुमार रतनचंद बुंदेला हे मागील 32 वर्षापासून यवतमाळ वर्तमान पत्रकारिता क्षेत्रात बुंदेला अ‍ॅड्स व दै. सिंहझेपचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून त्यांनी या अगोदर यवतमाळ जिल्ह्यात पत्रकार संघाच्या विविध दुरध्वनी क्रमांक पुस्तकांचे विमोचन केले आहे. त्यांची ही निवड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डि. टी. आंबेगावे सर यांनी केली असून त्यांच्या या नियुक्तीमध्ये संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांची महत्वपूर्ण भूमिका असून श्री. विजय बुंदेला यांनी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला असून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी भरीव अशी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या या नियुक्तीचे जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे, अमोल सांगाणी, सविता चंद्रे आदिंनी त्यांचे स्वागत केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.