WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

घूग्गूस येथील कुणबी समाज प्रबोधन मेळावा संपन्न ...

Image

प्रतिनिधि अमोल कुमरे -

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भेदभाव विसरून कुणबी समाजाने आजच्या घडीला एकत्र येण्याची गरज...!!

दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी घुग्गुस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालय कुणबी समाज प्रबोधन मेळावा संपन्न झाला. यात विशेष उल्लेखनीय बाबीवर प्रबोधन करण्यात आले. समाजाची झालेली पीछेहाट तसेच विषमता वाढविणारे शिक्षण आणि हातात नसणारी सत्ता या दोन गोष्टी समाजासाठी बाधक ठरत असल्याचे या प्रबोधन मेळाव्यात सांगण्यात आल्या.

महाराष्ट्रात संख्येने सर्वात मोठा समाज आहे. त्यात 95 टक्के समाज खेड्यात राहतो, शेतात राबतो, शिक्षणाचा अभाव; अंधश्रद्धाचा प्रभाव आणि रूढी- परंपरा दबाव यामुळे त्याचा स्वभाव विशिष्ट प्रकारचा बनलेला आहे. समाज जागृत नसला आणि अडाणी असला तर कुटील, क्रूर आणि स्वार्थी लोकं त्याची दिशाभूल करतात.

कुणबी समाज कला साहित्य शैक्षणिक क्षेत्रात बरीच पीछेहाट झालेली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भेदभाव विसरून कुणबी समाजाने आजच्या घडीला एकत्र येण्याची गरज आहे. जो समाज एकत्र असतो त्याच्या शक्तींविरुद्ध लढण्याची ताकद कोणी करत नसतो. त्याच्यावर अन्याय करण्यास धजावत नाही आणि हेच ब्रीद अंगीकारून समाजात जाणीव जागृती व्हावी याकरिता या कुणबी समाज प्रबोधन मेळाव्याचे समस्त कुणबी परिवार, घुग्गुस यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्री. रमेशजी राजूरकर अध्यक्ष कु. स. मं. वरोरा, कार्यक्रमाचे अध्यक्ष.मा. श्री. प्रा. विजयजी बदखल संचालक इंस्पायर इन्स्टिटयूट चंद्रपूर,

प्रमुख उपस्थिती मा. श्री. ईश्वर कुरेकर अध्यक्ष कु. स. मं. चंद्रपूर, आशिष कुळसंगे सदस्य जि. प. यवतमाळ, मा. श्री. पांडुरंगजी टोंगे कु.स.मं. भद्रावती, मा. श्री. दिनकर डोहे कु. स. मं. राजुरा, राजेशजी पाहपळे कु. स. मं. वणी, उमेशजी पारखी कवी व सामाजिक कार्यकर्ता सौ.संध्याताई नांदेकर संस्थापिका कु. स. महिला आघाडी वणी, सौ.किरणताई देरकर अध्यक्ष एकविरा पतसंस्था वणी, सौ.वंदनाताई आवारी अध्यक्ष ध. कु. महिला आघाडी वणी, सौ. सपनाताई पावडे ध. कु. महिला आघाडी वणी, अशोकभाऊ चिकटे, विकासभाऊ देवतळे, देवराव भोंगळे माजी जि.प. सदस्य, विजय बदखल, मुरली भोयर, केतन पारखी.

या कार्यक्रमाला विशेष सहकार्य संतोष लांडे, स्वप्नील वाढई, किशोर जोगी, सचिन बोथले, महेश गुंजेकर, सचिन वऱ्हाटे, जितू झाडे, मंगेश हिरदेवे, राकेश जेणेकर आदींनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.