WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मार्डी ते मजरा कंबरतोड रस्त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांची होतेय होरपळ!

Image

मार्डी, मजरा ते गाडेगाव रस्त्याचे काम कासव गतीने

अपघाताची शक्यता

सचिन मेश्राम मारेगाव -

मार्डी, मजरा ते गाडेगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजणे अंतर्गत लाखो रुपये मंजूर करण्यात आले आहे मात्र या रस्त्याचे बांधकाम कासव गतीने सुरु असून अपघाताची शक्यता बोकाळली आहे

मारेगाव तालुक्यातील मार्डी, मजरा ते गाडेगाव या 3कि,मी,रस्त्याची सुधारणा करण्यासाठी मागील सन2018-19 मध्ये 166.69 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते या विकास कामाचे भूमिपूजन तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर उद्घाटक तर अध्यक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार होते 28डिसेंबर 2018रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्याला तत्कालीन पालक मंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थीत होते, मात्र या सोहळ्या नंतर तब्बल एक वर्ष पूर्ण होऊनही हे काम पुर्ण झाले नाही.रस्त्यावर बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पसरलेला असल्याने रस्त्यावरून ये -जा करणार्‍याना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुक दाराना येजा करण्यासाठी रस्त्याचे बाजुला थोडीही जागा शिल्लक नसल्याने अस्ताव्यस्त पसरलेल्या साहित्या वरुन वाहने चालवावे लागत असल्याने अपघाताची शक्यता बोकाळली आहे वाहने पंक्चर होणे नित्याची बाब असून कंत्राटदार हे बांधकाम पुर्ण करेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मजरा हे गाव यवतमाळ जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर यांचे असताना विकास कामास तत्कालीन भाजपा नेते तथा केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी मंजुरात दिली मात्र भूमिपूजना नंतर या विकास कामाची गती मंदावली असुन रस्त्याची सुधारणा होण्या ऐवजी पुर्णपणे वाट लागली आहे आमदार बोदकुरवार यांचे खंदे समर्थक तथा भाजपा नेते सुधाकर बोबडे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजुर झाला असला तरी तो पूर्ण होईल की नाही असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला असून रस्त्याच्या सुधारणा कामाचे घोडे कुठे अडले या बाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.हे काम तातडीने पुर्ण करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......