WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथे सहजयोगावर कार्यशाळा

ImageImage

सागर मुने,वणी

वणी तालुक्यातील गणेशपूर येथील सहज ध्यान मंदिरात सहजयोगावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उदघाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर. या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक पुणे येथील डॉ. विश्वजीत चव्हाण, चंद्रपूर येथील राजेश वांढरे, प्रदीप लोखंडे, केशव ढवस, तात्या थेरे, नागपूर येथील राजू लार्डीकर, महेश लार्डीकर, वणी सहजयोग ध्यान केंद्राचे समन्वयक रवी कुंटावार यांनी दीप प्रज्वलन केले.

प्रास्ताविक सहजयोगाचे विभागीय समन्वयक राजेश वांढरे यांनी केले. आ. बोदकुरवार यांनी सहजयोगाचा त्यांना आलेला सकारात्मक अनुभवाचे कथन करून सहजयोगा मुळे मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन केले. डॉ. विश्वजीत चव्हाण यांनी सहजयोगाचे महत्व सांगताना म्हणाले की, आपल्या आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून अलिप्त जाऊन मोक्षप्राप्ती साठी जगातील जवळजवळ130 देशामध्ये प.पू. श्री निर्मला माता प्रणित सहजयोग हा सर्वोत्तम मार्ग आहे. असे सांगून त्यांनी ध्यानात गहनता कशी प्राप्त करावी. सहजयोगात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय इत्यादी बाबीवर त्यांनी व नागपूर येथील सहकारी सहजयोग्यांनी प्रत्यक्ष कृती करून मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहज मंदिर समितीचे अध्यक्ष गजानन कासावार केले. आभार प्रदर्शन रवी कुंटावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर सवाई, योगेश इंगळे, रामकृष्ण मेश्राम, विकास मेश्राम, राजू गेडाम, एकनाथ साळवे, सुधाकर वाटेकर, देशराज मदान, गजानन बत्तुलवार, विजय ठेंगणे, रामचंद्र बोरपे, बाळू कुंटावार इत्यादी सहजयोग्यांनी परीश्रम घेतले. या कार्यशाळेत परिश्रम घेणाऱ्या युवाशक्तिचा सन्मान करण्यात आला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले